E Pik Pahani | ई पीक पाहणी कशी करावी 2024

E Pik Pahani | ई पीक पाहणी कशी करावी 2024 : मित्रांनो नमस्कार, तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या epikpahani.com या वेबसाईट वर मित्रांनो ई पीक पाहणीसाठी अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत असतात आणि त्याचं निराकरण करण्यासाठी शेतकरी बांधव अनेक ठिकाणी वारंवार फेऱ्या मारत असतात किंवा अनेक प्रॉब्लेम त्यांना सोडवता येत नाही. त्यामुळेच आपल्या या ई-पीक पाहणी ही वेबसाईट सुरू केली असून या वेबसाईटच एकच उद्देश आहे की ई-पीक पाहणी करत असताना येणाऱ्या सर्व अडचणी शेतकऱ्यांना सहजरित्या त्या दुरुस्त करतायाव्या आणि शेतकरी बांधवांचा पीक पेरा हा ई-पिक पाहणी द्वारे शासनाकडे जमा व्हावा आणि त्यांना पिकाची भरपाई तसेच विमा मिळण्यास कोणती अडचण येऊ नये यासाठी ही खास ई पिक पाहणी epikpahani.com ही वेबसाईट बनवली गेलेली आहे.

आता आज आपण या लेखांमध्ये ई-पिक पाहणी कशी करावी 2024 ? ई पिक पाहणी का करणे गरजेचं ? ई पीक पाहणी केली नाही तर काय होते ई पीक पाहणी करण्यासाठी काय पद्धत आहे ई पीक पाहणी यशस्वीरीत्या कशी केली जाते ई पिक पाहणी संदर्भातील सविस्तर माहिती आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. मित्रांनो ई पिक पाहणी ब्लॉग फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी तयार करण्यात आलेला आहे हा एकमेव असा ब्लॉग असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती वेळोवेळी अपडेटेड मिळणार आहे त्यामुळे आपल्या वेबसाईट वर तुम्हाला व्हिजिट करत राहायचं आहे.

E Pik Pahani | ई पीक पाहणी कशी करावी 2024

मित्रांनो ई-पीक पाहणी कशी करायची ? ही माहिती आज आपण ई-पीक पाहणी epikpahani.com या वेबसाईट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून गेल्या 3 ते 4 वर्षापासून ई पीक पाहणी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाद्वारे राबवण्यात येतो आहे. या उपक्रमाद्वारे शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातून शेतातल्या पिकांची नोंद ही सातबारा उताऱ्यावरती करू शकणार आहे, यालाच ई-पीक पाहणी म्हटले गेलेल आहे. याचाच अर्थ आता ज्या शेतकऱ्यांनी जे पीक लावलेला आहे त्या पिकाची नोंद ही सातबारा वर करण्यासाठी उपक्रम शासनाकडून राबवण्यात येतो.

E Pik Pahani

त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद ही सहजरित्या करता येते. ई-पीक विमा असेल किंवा अन्य शासनाच्या योजना असतील किंवा लाभ असेल हा सहजरीत्या या ठिकाणी मिळवता येतो. पिक विमा असेल याबाबत या ठिकाणी शेतकऱ्यांना यामुळे मदत होते परंतु अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येत नाही किंवा अनेक अडचणी त्यांना येत असतात. या सर्व अडचणी काय आहेत ई पीक पाहणी कशा पद्धतीने केली जाते ई-पिक पाहणी केल्यानंतर ती यशस्वीरित्या अपलोड झालेली आहेत का ? हे देखील पाहणं त्यात गरजेचं असतं त्यासाठी हा लेख संपूर्ण तुम्हाला वाचायचा आहे.

ई-पीक पाहणी कशी करावी ? ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन वरून कशी करावी ?

ई-पीक पाहणी संदर्भातील संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला खाली दिली आहेत.

मित्रांनो सर्वप्रथम ई-पीक पाहणी App करण्यासाठी मोबाईल प्ले स्टोअर वरून महाराष्ट्र शासनाचं ई-पीक पाहणी नावाचं ॲप्लीकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावे लागणार ई-पीक पाहणी DCC या नावाचा एप्लीकेशन आहे Revenue Department of Maharashtra Goverment चे हे एक एप्लीकेशन आहे. याच मोबाईल Aap च्या माध्यमातून तुमच्या पिकाची नोंद थेट सातबारावर करता येते. आता याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे ती फॉलो करून तुमच्या पिकाची नोंद सातबाऱ्यावरती करू शकता.

पिक पाहणी
  • ई-पीक पाहणी मोबाईल वरून करण्यासाठी तुमच्या मोबाईल वरील प्ले स्टोअर वर ओपन करा
  • त्यानंतर सर्च बारमध्ये ई-पीक पाहणी असं सर्च करा
pahani
  • त्यानंतर अधिकृत महाराष्ट्र शासनाचं ई-पिक पाहणी नाव एप्लीकेशन येईल त्याला इन्स्टॉल करून ओपन करायचं ई-पिक पाहणी नावाचा ॲप्लिकेशन्स तुम्हाला ओपन झाल्यानंतर डावीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती दिलेली असेल
  • पुन्हा एकदा वाचायचे आहे आणि उजव्या बाजूला स्क्रोल करायचा आहे
hana
  • त्यानंतर जसं की सातबारा उतारा इत्यादी त्यानंतर महसूल विभाग त्यामध्ये तुमचा कोणता आहे तो निवडायचा आहे पुढे नवे खातेदार म्हणून या पर्यावरती क्लिक करायचं आहे
  • सुरुवातीला विभाग/ जिल्हा/ तालुका / आणि गाव निवडायचे
  • त्यानंतर मग पहिलं/ मधलं / किंवा आडनाव तसेच खाते क्रमांक किंवा गट नंबर टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता
mahasul
  • त्यानंतर गट क्रमांक पर्याय वर क्लिक करून तो खाली क्रमांक टाकायचा आहे मग शोधा वर करायचे
  • त्यानंतर खातेदार तुम्हाला निवडावा लागेल खातेदार च नाव खातेदारांचा क्रमांक तपासून तुम्हाला समोर जावे लागेल
sanketank
  • त्यानंतर तुमच्या समोर संकेतांक पाठवा नावाचे पेज दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे
  • त्यानंतर नोंदणी खालील पद्धतीने झालेली आहे हे तुम्हाला दिसेल
nondni
  • त्यानंतर मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबा मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यावरण क्लिक करा
  • आणि गेल्या वर्षी या अँप वर नोंदणी केली असेल तर तुमची नोंदणी आधीच झालेली आहे
  • आता तुम्हाला पुढे जायचं आहे असे मेसेज येईल तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • तुम्ही पहिल्यांदाच नोंदणी करणारा असाल तर तो मेसेज येणार नाही इथे हो पर्याय वर तुम्हाला क्लिक करायचे
  • त्यानंतर खातेदारांचं नाव निवडा सांकेतंक विसरलात यावर क्लिक करा
  • मग सांकेतक क्रमांक टाका आणि स्क्रीन आली की मग होम पेज वर या आणि ई-पीक पाहणी अँपवर तुम्ही तुमच्या पिकाची नोंद करू शकता
pikanachi nond
  • ई-पिक पाहणी नोंदवा या पर्यवर क्लिक करायचे
  • मग खाते क्रमांक / गट क्रमांक निवडावा लागेल लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र आहे त्याचे ठिकाणी आपोआप येईल
  • त्यानंतर हंगाम कोणता आहे तो निवडायचा आहे पिकाच वर्ग निर्मळ पीक / मिश्र पीक / किंवा इतर पिके असतील ते निवडायचे
  • पिकाचं नाव आणि क्षेत्र हेक्टर / आर मध्ये टाकून घ्यायचे त्यासोबतच ही माहिती भरून द्या
pik nond
  • पुढे जलसिंचनाचे साधन जसे की विहीर / तलाव निवडायचे जे त्या ठिकाणी दिसून येईल ते निवडायचे
  • त्यानंतर पुढे अक्षांश रेखांश या पर्यावर क्लिक करा असे दिसेल
  • त्यानंतर शेवटी पिकांचा फोटो काढा यावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करा
pikacha photo
  • फोटो तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे हे लक्षात घ्यायचं फोटो काढून त्या ठिकाणी लोकेशन परवानगी तुम्हाला मागेल मोबाईलची लोकेशन पर्याय जो आहे तो ऑन करायचा आहे
  • सर्व परमिशन असतील त्या देऊन टाकायचे त्यानंतर तुम्ही जे माहिती भरली ती तुमच्या समोर दाखवली जाईल त्या खालच्या स्वयं-घोषणावर तुम्हाला क्लिक करून जी काही माहिती तुम्ही साठवलेली आहे ती अपलोड आहे
pikcha phto
  • असे सूचना या ठिकाणी दिसेल नोंदवलेले पिकाची माहिती पाहण्यासाठी पिकाची माहिती पहा यावर क्लिक करून घ्या.
pik mahiti

तुम्ही भरलेली माहिती पाहू शकाल ई-पाहणी करत असताना येणाऱ्या अडचणी काय असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं शेतकरी बांधवांनी हेल्पलाइन नंबर सुद्धा आहे पिक पाहणी एप्लीकेशन मध्ये दिलेला आहे. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी हेल्पलाइन वर कॉल करून तुमच्या अडचणी दूर करू शकता. असंच याचबरोबर तुम्ही फक्त पिकांच नव्हे तर तुमच्या बांधावरील झाडांची नोंद देखील करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करता येते.

नवीन ई-पीक पाहणी App येथे क्लिक करून डाउ…लोड करा

ई-पीक पाहणीचे फायदे काय ?

शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतात ते प्रश्न नेमकी काय आहे आणि त्यासाठीच उत्तर काय आहे हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर यामध्ये एमएसपी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा शेतमाल किंवा आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठी तुमची संमती हा डेटा त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे तुम्हाला एमएसपीद्वारे या ठिकाणी हमीभाव मिळू शकतो तसेच पीक कर्जाच्या पडताळणीसाठी देखील या ठिकाणी तुम्हाला ईपीक पाहणी करणे फायद्याचे ठरते. जसे की पिकावर कर्ज घेतले तेच पीक लावलं का याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्यावर बँका आज घडीला हा डेटा वापरत असल्याची माहिती आहे.

त्यामुळे नक्कीच पिक कर्ज घेण्यासाठी देखील ही माहिती कामात पडते तसेच पीक विमा योजनेचा लाभासाठी देखील पीक पाहणी फायद्याचे ठरते विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेला पीक आणि ई-पिक पाहणी नोंदवले पीक या तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहीत धरला जातो या ठिकाणी लक्षात धरायचे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून जे काही भरपाई मिळते यासाठी नुकसान भरपाई मध्ये देखील ई पिक पाहणी काम करते जसे की आता सध्या कापूस आणि सोयाबीन यासाठीच अनुदान शासनाकडून दिले जात आहे आणि अनुदानासाठी ई-पिक पाहणी ग्राह्य धरण्यात आली होती हे तुम्हाला देखील माहिती असेल त्यामुळे या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पिकाच नुकसान झालं असेल तर भरपाई मिळवण्यासाठी ई पिक पाहणी करणे फायदेशीर ठरते.

ई पीक पाहणी कशी करावी ? याचा व्हिडीओ येथे क्लिक करून पहा

ई-पीक पाहणी म्हणजे नेमकं काय ?

अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना माहिती सुद्धा नाहीयेत की ई-पिक पाहणी काय आहे आणि पीक पाहणीचे फायदे काय आणि तोटे काय हे अनेकांना माहिती नाही तर अशाच वेळी ई पिक पाहणी म्हणजे काय आणि त्याचबरोबर त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे देखील समजून घेऊया. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की गाव खेड्यात दिवस उजळतात चर्चा सुरू होत आहे ती म्हणजे ई पीक पाहण्याची तर अशावेळी शेतकऱ्यांना माहिती नसते ई-पिक पाहणी काय आहेत पिक पाहणी मध्ये नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची धावफल सुरू आहे त्यात नेमके ई-पिक पाणी काय आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.

ई-पीक पाहणीचे फायदे काय ?

ई-पिक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांचे पीक पेरणीचे अचूक नोंदवणार आहे यामुळे ना शेतकऱ्यांनाच नुकसान होणाऱ्या नाही हे शेतकऱ्यांचे नुकसान होणार तर या संदर्भातीलच असे अनेक फायदे आहे तर आता या ई-पिक नोंदीमुळे राज्यात देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आणि त्याची अचूक आकडेवारी शासनाला बांधता येते आणि पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो आणि यामुळे यावरूनच भविष्यात बी बियाणे किती लागणार खत किती उपलब्ध आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फायदेशीर ही असते. आता पिकाच्या छायाचित्र मुळे किती ऑप्शन्स आणि किती रेखांश कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. तसेच एका मोबाईल वरून वीस शेतकऱ्यांची नोंदी करता येते तर प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळे अशा प्रकारची सोय शासनाकडून यावेळी करण्यात आलेली आहे. तर ही नक्कीच शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणीचे फायदे होते हे ई-पीक पाहणी करणे फारच गरजेचे आहे.

ई-पीक पाहणी शासन निर्णय 1येथे पहा
ई पीक पाहणी शासन निर्णय 2येथे पहा
पिक पाहणी हेल्पलाईन क्रमांक02025712712
ई पीक पाहणी Appयेथे पहा
ई पीक पाहणी वेबसाईटयेथे पहा

ई-पीक पाहणी मधील ॲप मधील त्रुटी काय ?

ई पीक पाहणी करत असताना अनेक अडचणी तुम्हाला येतात त्या अडचणी काय आहेत हे देखील पाहू. या ई पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य ती नजागृती नसल्याकारणांनी अनेक अडचणी येतात अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल वापराची माहिती शेतकऱ्यांना नसल्याकारणाने ही अडचण येते. तसेच यामध्ये नेमकी माहिती भरायची कशी हे शेतकऱ्यांना माहिती नसतं त्यामुळेच आपण हा शेतकऱ्यांसाठी खास ब्लॉग तयार केलेला आहे. शेतकऱ्यांना कशाप्रकारे माहिती भरून घेतली जाते मात्र दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार नाही याची स्पष्ट आहे. म्हणजे स्वतः या ठिकाणी ई-पिक पाहणी करावी लागणार आहे. अन्ना आपले पिकाचा पेरा हा सातबारा उतारा नोंदवावा लागणार आहे असे काही अडचणी आहेत या ठिकाणी ई-पीक पाहणी द्वारे आहे ही पिक पाहणी वगैरे कशी करायची याची माहिती तर वर दिलीच आहे तर आता ई-पीक पाहणी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया.

ई-पीक पाहणी म्हणजे काय रे भाऊ ?

शेतकरी बांधवांनो अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील की ई-पीक पाहणे म्हणजे काय ? तर मित्रांनो त्याचे उत्तर काय आहे समजून घेऊया. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद तलाठी यांच्याकडून केली जात होती आणि त्यातच प्रत्यक्षात गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेन त्याचीच नोंद पिकाची पेरा असा हा ग्राह्य धरून नोंद या ठिकाणी होत होती. त्यामुळे नुकसान भरपाईच्या दरम्यान अनेक अडचणीचा सामना अधिकारी आणि शासनाला करावा लागत होता तर शासकीय मदत लाटली जात होती. शेतकऱ्यांच्या पिरले पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा व्हावा दृष्टिकोनाने या ठिकाणी ई-पीक पाहणी अँप्स निर्माण करण्यात आले यामुळेच आता ई-पीक पाहणी म्हणजे काय हे प्रश्न तुमच्या मिटला असेल कारण की पिक पाहणी म्हणजेच तुमच्या पिकाची तुमच्या शेतातील जे काही पीक लावलेला आहे. तिची नोंद ते तुमच्या सातबाऱ्या वरती नोंदवण्याचा जो काही प्रोग्रॅम आहे किंवा योजना आहे यालाच ई-पीक पाहणे असे म्हटले गेले आहे. ई-पीक पाहणी द्वारे शेतकरी आपल्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर करू शकतो त्यामुळे नक्कीच ई पीक पाहणी उपक्रम हा जोरदार आहे आणि या असंच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शासनाने हा उपक्रम राबवला गेलेला आहे.ई पिक पाहणी कशी करायची आहे वव-पिक पाहणी मध्ये एप्लीकेशन कोणतं वापरायचा आहे याची माहिती थोडक्यात पाहूया.

E Pik Pahani App 2024

शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासनाकडून ई-पिक पाहणी नावाचा एप्लीकेशन हे सुरू झालेला आहे हे ॲप्लिकेशन वेळोवेळी अपडेट केलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी जे काही नवीन अपडेट्स आहेत ते मिळत आणि त्यांची पिकाची पिक पाहणी ही त्वरित केला जात आहे अशातच आता महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी ई-पिक पाहणी एप्लीकेशन मध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता देखील एप्लीकेशन मध्ये अपडेट आलेला आहे ते प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करायचा आहे. तुम्ही App इंस्टॉल केला नसेल तर नवीन इंस्टॉल करून ई पिक पाहणी मोबाईलच्या साह्याने वर दिलेल्या माहितीनुसार वर देण्यात आले आहेत. फोटोमध्ये पाहून ई पिक पाहणी करू शकता अथवा खाली देण्यात आलेला शेवटी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ प्ले करून तुम्ही या ठिकाणी ई-पिक पाहणी कशी करायची आहे याची माहिती मिळवू शकता.

ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख काय आहेत 2024

महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी प्रत्येक हंगामासाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी शेवटची तारीख ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी दिली जाते ई-पीक पाहणी कोणत्या तारखेपर्यंत पिक पाहणी करण्यासाठी काय शेवटची तारीख आहे हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर 23 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती परंतु यामध्ये मुदतवाढ मिळू शकते असा अपडेट आहे. जसे काही नवीन अपडेट येईल ते आपण या ठिकाणी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तर आता ई-पीक पाहणी कशी करायची या संदर्भातील सर्व प्रश्न तुम्हाला मिळाले असतील आणि आता राहायला प्रश्न ई-पीक पाहणी संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाइन नंबर तर मित्रांनो या हेल्पलाइन नंबरसाठी तुम्हाला प्ले स्टोर वरील ई-पीक पाहणी नावाचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. त्या ठिकाणी मदत हा पर्याय तुम्हाला दिसून येतो त्यावरती क्लिक करून त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही कॉल करून तुमचे जे काही अडचणी आहे त्या ई-पीक पाणी संदर्भातील दूर करू शकता, आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच ई-पीक पाहणी epikpahani.com या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे धन्यवाद.