E Pik Pahani Village List Kharif 2024 | ई पीक पाहणी लिस्ट कशी पहावी खरीप 2024

E Pik Pahani Village List Kharif 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी करताना अडचणी येतात आणि अडचणी या शेतकऱ्यांना कशास सोडाव्यात हे समजत नाही किंवा त्यांना माहिती नसतं तर अशावेळी तुम्हाला सर्व माहिती अगदी मोफत मध्ये एकच ठिकाणी मिळाली तर हे खूपच चांगल आहे. यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कारण की ई पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हा ब्लॉग म्हणजेच epikpahani.com हा ब्लॉग बनवण्यात आलेला आहे.

या ब्लॉग वर संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खास देण्यात आलेली आहे, आता ई पीक पाहणी अंतर्गत तुमची ई-पीक पाहणी झाली आहेत का याची लिस्ट तुम्ही आता तुमच्या मोबाईल मध्ये ही मिळवू शकता. आता ई-पीक पाहणी करत असताना तुमची ई पीक पाणी यशस्वी झाली तर तुमची पिकाची नोंद ही सातबारा वर केली जाते. आता ई पीक पाहणी महाराष्ट्र शासनाचा हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरतील शेतकरी त्यांच्या पिकाची नोंद ही हंगामानुसार त्या आपल्या सातबारे वर नोंदवू शकतो.

E Pik Pahani Village List Kharif 2024 कशी पहावी ?

ई पीक पाहणी झाल्यानंतर त्याची नोंद तुमच्या सातबारावर झाली आहे का किंवा गावानुसार तुम्ही लिस्ट कशी मोबाईल वरती मिळू शकत आहे. आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम ई पीक पाहणी कशी करावी ई पीक पाहणी म्हणजे काय ? आणि ई पीक पाहणी करण्यासाठी फायदे आणि तोटे काय आहे ही संपूर्ण माहिती आपल्या ब्लॉगच्या ई पीक पाहणी ब्लॉगच्या होम पेज वर तुम्हाला देण्यात आलेली आहे, त्यावरती तुम्ही ती संपूर्ण माहिती मिळवू शकता.

ई पीक पाहणी गावानुसार लिस्ट कशी मिळवावी ?

ई पीक पाहणीची लिस्ट किंवा त्यामध्ये तुमचं नाव आला आहे का ? म्हणजे तुमच्या पिकाची नोंद ई पीक पाहणी द्वारे सातबारा वर नोंदवली गेलेली आहेत का हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खालील स्टेप फॉलो करायचे आहेत.

  • ई पीक पाहणी लिस्ट पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • अधिकृत वेबसाची लिंक पुढे दिलेली आहे
  • https://epeek.mahabhumi.gov.in/misv2/
  • यानंतर डाव्या बाजूला View Summary रिपोर्ट या पर्यावर क्लिक करा
  • सर्वात प्रथम कोणत्या हंगामाची लिस्ट तुम्हाला पाहिजे आहे तो खरीप रब्बी वार्षिक हे निवडा
  • विभाग जिल्हा तालुका आणि शेवटी गाव निवडा
  • ई पीक पीक पाहणी अहवाल वर क्लिक करून घ्या

त्यानंतर ई पीक पाहणी संदर्भातील संपूर्ण गावांची यादी ही तुम्हाला ओपन झालेली दिसेल ओपन झाल्यानंतर ही यादीमध्ये तुमचं नाव गावातील कोणाचं नाव या ठिकाणी आहे हे चेक करता येत आणि यानंतर ज्या ई पीक पाहणीची लिस्ट कशाप्रकारे आहे. याची लिस्ट तुम्हाला खाली स्क्रीन शॉट मध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता.

ई पीक पाहणी गावांची यादी 2024

या लिस्टमध्ये तुम्हाला दिसून येत हे देखील पाहणं फार गरजेचे आहे. यामध्ये खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, ई पीक पाहणी दिनांक पिकाचे नाव पिकाचे प्रकार पेरणी क्षेत्र याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते. गावातील कोणत्या लोकांची काय लावलेला ? हे तुम्हाला समजते आता नाव या गावाच्या ई पीक पाहणी यादीत नसेल तर पीक पाहणी केली नसणार

जर आपण ई पीक पाहणी केली नसेल तर या यादीत नाव तुमचे येणार नाही तर ते पाहणी कशी करायची यासंदर्भातील व्हिडिओ देखील खाली दिलेला आहे. ई पीक पाहणी कशी करावी ? केल्यानंतर ही ई पीक पाहणी यशस्वीरित्या झाली आहेत का ? याची लिस्ट सुद्धा तुम्हाला पाहता येते याचा व्हिडिओ देखील खाली दिलेला आहे.

Leave a Comment