E Pik Pahani Kashi Karavi मित्रांनो नमस्कार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा राज्य शासनाचा उपक्रम हा ई पीक पाहणी आहे कारण ई पीक पाहणीच्या माध्यमातून आता शेतकरी आपल्या पिकाची नोंद आहे ही सातबारा वरती करू शकतो. जर तुम्ही ई पीक पाहणी द्वारे सातबाऱ्यावर पिकांची नोंदवला नाही तर तुमचा सातबारा कोरा राहील आणि सातबारा कोरा राहिला तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून शेती संबंधित नुकसान भरपाई अतिवृष्टी भरपाई तसेच पिक विमा हे या ठिकाणी मिळण्यास ई पीक पाणी केल्यानंतर फायदा होतो. जर तुम्ही ई पिक पाहणी केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी पिक विमा व भरपाई मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते हे देखील समजून घ्यायचं आहे.
कारण की ई पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद करता येते कायम पड नोंदवता येते बांधावरील झाडांची नोंद या ठिकाणी करता येते. माहिती अपलोड झालेली आहे किंवा नाही हे देखील त्या ठिकाणी पाहता येते, आणि ई पीक माहितीची जी अपडेट आहे ही देखील तुम्हाला या ठिकाणी ई पीक पाहणी एप्लीकेशनच्या माध्यमातून करता येते. आता आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ई पीक पाहणी कशा पद्धतीने केली जाते.
ई पीक पाहणी नवीन App (Play Store) | येथे पहा |
ई पीक पाहणी शासन निर्णय | येथे पहा |
ई पीक पाहणी कशी करावी व्हिडीओ | येथे पहा |
E Pik Pahani Kashi Karavi 2024
ई पीक पाहणी वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे कोणते ॲप्लिकेशन आहे त्याचा कोणतं वर्जन सध्या सुरू आहे ई पीक पाहणी कशा पद्धतीने केली जाते याची सविस्तर माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता ई पीक पाहणी केली तर तुमच्या पिकाची नोंद सातबारा वरती होते. त्याचा तुम्हाला अनेक फायदे मिळतात तर आता ई पीक पाहणी महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या योजनेचा पहिला जीआर 15 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता ई पीक पाहणी कशी करावी आता हे आपण या ठिकाणी खाली पाहूया.
खरीप हंगाम ई पीक पाहणी कशी करावी 2024
हे सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे की ई पीक पाहणी कशी केली जाते. याची संपूर्ण माहिती आपल्या epikpahani.com या वेबसाईट वर होम पेजला तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये व्हिडिओ सोबत आणि इमेज सोबत तुम्हाला ही सगळी माहिती त्या ठिकाणी समजून सांगण्यात आलेली आहे, होमपेज वर गेल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी कोण कोणते पिकाची यामध्ये नोंद तुम्ही करू शकता ? ज्या पिकांची तुमच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे त्याची नोंद तुम्ही करू शकता, खरीप हंगाम, रब्बी हंगाम, आणि वार्षिक पिकांची नोंद या ठिकाणी करता येते. तुमच्या शेताच्या बांधावरील झाडे असतील तर त्याची देखील नोंद या ठिकाणी करता येते. ई पीक मोबाईलच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर विविध पिकाची तसेच झाडांची नोंद ही करू शकतात. महसूल विभागाच्या ई पीक पाहणी प्रकल्प हा 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सुरू झालाय. आता ई पीक पाहणी एप्लीकेशन आणि या योजनेचा पहिला जीआर हा तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे जीआर तुम्ही पाहू शकता.
ई-पीक पाहणी किती प्रकारची? कोणत्या हंगामात किती वेळा पिकाची नोंद.?
ई पीक पाहणी कशी करायची ?
शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल ई पिक पाहणी आहे तरी काय ? ही महाराष्ट्र शासनाचा एक उप्रकम आहे. आता ई पीक पाहणी संदर्भातील महाराष्ट्र शासनाकडून नवीन ई पीक पाहणी हे आपलिकेशन सुरू केलेला आहे या ई पीक पाहणी एप्लीकेशनचं नाव ई पीक पाहणी DCA असं देण्यात आलेला आहे महसूल विभागाचं हे ॲप्लिकेशन असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन वर फोटो देखील दिसत असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी अँप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता.
- ही पिक पाहण्याचा इंस्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचा आहे.
- ओपन झाल्यानंतर ही पिक पाहणीच्या एप्लीकेशन ओपन झाल्यावर राईट साईडला सरकवायचा आहे
- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसून येईल
- ज्या काही परमिशन मागितल्या जात आहे त्या परमिशन Allow करायचे आहे.
- त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला महसूल विभाग तुमचा निवडावा लागेल
- मोबाईल नंबर, तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याचा निवड करावा लागेल
- पुढील प्रक्रियासाठी बटनावरती क्लिक करा
- प्रक्रिया मध्ये तुमचे नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक ही माहिती भरून शोध बटन वरती क्लिक करा
- खाती निवडून पुढे पर्यावर क्लिक करा ई पीक पाहणी मध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती निवडावी लागते
- यामध्ये खास करून खाते क्रमांक असेल भूमापन गट क्रमांक जमिनीचे एकूण क्षेत्र किती हंगाम कोणता आहे आणि पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहेत हे या ठिकाणी तुम्ही चेक करून ते माहिती भरू शकता.
आता ई-पीक पाहणी करणे फार सोपा आहे इथे ई पीक करणं पहिल्यापेक्षा अवघड नाही ती ईपीक पाहणी आता स्वतः घरबसल्या एक माणूस या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी काय अपडेट आहे हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
ई पीक पाहणी हेल्पलाइन नंबर कोणता ?
हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे मध्ये शेतकऱ्यांच्या मदतीकरिता आहे या ठिकाणी मदत बटन तुम्हाला या ई पीक पाहणी एप्लीकेशन वर देण्यात आला आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. किंवा या ठिकाणी प्रश्न किंवा अडचणी आहेत शंका आहे त्या सांगू शकता. यासाठी मदत कक्ष क्रमांक देखील आहे 022 25 712 712 या अधिकृत दूरध्वनी क्रमांक वर तुम्हाला मेसेज कॉल तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता ई पीक पाहणी कशी करायची आहे याचे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे मित्रांनो यामध्ये माहिती सांगितली तरी तुम्हाला या ठिकाणी ही माहिती समजणार नाही त्यामुळे या ठिकाणी तुमच्यासाठी खास व्हिडिओ तो दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी तुमच्या पिकाची जी काही नोंद आहे ही सातबारा वर करू शकतात. ई पीक पाहणी कशी करायची ? आहे ई पीक पाहणी संदर्भातील नवीन लेटेस्ट एप्लीकेशन लिंक त्याचबरोबर जीआर हे संपूर्ण तुम्हाला खाली देण्यात आली आहे धन्यवाद.