E Pik Pahani Kiti Prakar Ahet नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आज घेऊन आलो आहे. आज या लेखाच्या माध्यमातून ई-पीक पाहणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली असते किंवा अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी काय आहे हे माहिती नसते. ई-पीक पाहणी मधून कोणकोणत्या पिकाची नोंद किंवा कोणत्या झाडांची नोंद आपण करू शकतो तसेच कोणकोणत्या तुमच्या शेतातून एखादी नदी, नाला, वाहत असेल किंवा पडीक जमीन आहे याची नोंदणी करता येते का?
असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आले असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो ई-पीक पाहणी किती प्रकारची असते ? हे अनेकांना माहिती नाही त्यामुळे आपण आज epikpahani.com या वेबसाईटच्या माध्यमातून ई-पीक पाहणी संदर्भातील संपूर्ण सिरीज बनवलेले आहे जेणेकरून ई-पीक पाणी संदर्भातील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही तर आता ई-पीक पाणी कशा पद्धतीने करायचे आहे हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
E Pik Pahani Kiti Prakar Ahet ई-पीक पाहणी केल्याने कोणकोणते फायदे ?
ई-पीक पाहणी केल्याने शेतकऱ्यांना अनेक चांगले आणि महत्त्वाचे फायदे मिळतात, जसे की शेतकरी आपल्या पिकाची नोंद ही स्वतः मोबाईल ॲपच्या माध्यमातून सातबारा वर नोंद करू शकतो. म्हणजेच जो काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये माल लावलेला आहे त्याचे नोंद सातबाऱ्यावर व्हावी यासाठी ई-पीक पाहणी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाकडून ई-पीक पाहणी म्हणून केला जातोय. यामधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल पिक विमा किंवा शासनाच्या अन्य योजनेचा लाभ असेल हा लाभ देखील ई-पीक पाहणी आधारेच केला जातो.
याचा सर्वात मुख्य उदाहरण म्हणजे ईपीक पाहणी यामध्ये आता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे शासनाकडून दिले जाते. यासाठी देखील ई-पीक पाहणी महत्वाची ठरली आहे. अतिवृष्टी असेल नुकसान भरपाई, पीक विमा या आधारे दिला जातोय. आता तुम्हाला कळलेच असेल की ई-पीक पाहणी म्हणजे काय ? ई-पीक पाहणी फायदे नेमके काय आहेत.
ई-पीक पाहणीचे किती प्रकार आहेत ?
ई-पीक पाहणी करणे फायदेशीर आहे अन्य योजनेचा लाभ देखील तुम्हाला यातून मिळतो, आणि आपल्या पिकाची योग्यती नोंद तुम्हाला स्वतः मोबाईलवरून पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करता येते. आता ई-पीक पाहण्याची किती प्रकार ? हे देखील समजून घ्या. ई-पीक पाहणीचं एकच प्रकार आहे तो म्हणजेच ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ई-पीक पाहणी करणे आणि दुसरा जो ऑफलाइन पद्धतीने होता जो थेट तलाठी यांच्याकडून केला जात होता परंतु तो सध्या बंद आहे. थेट मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच ई-पीक पाहणी होते आता ई-पीक पाहण्याची किती प्रकार आहे हे देखील तुम्हाला कळलं असेल तुम्ही तुमची पिकाची नोंद सातबारा वर नोंदवून घेऊ शकता.
E Pik पाहणी किती हंगामासाठी असते.?
ई-पीक पाहणी करत असताना अनेकांना प्रश्न पडतो की कोण कोणत्या पिकासाठी किंवा कोणत्या हंगामासाठी ई-पीक पाहणी केली जाते तर यात सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे हे पीक पाहणी करत असताना हंगाम ठरवण्यात आलेले आहेत. हंगाम यामध्ये रब्बी, खरीप आणि वार्षिक असे तीन प्रकार आहेत, तीनही पद्धतीने तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता. वार्षिक पीक असेल तर वार्षिक आणि खरीप, रब्बी असतील तर त्यानुसार तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता यामध्ये हे तीन प्रकार यामध्ये मुख्यतः येतात.
ई पीक पाहणी द्वारे कशाकशाची नोंद केली जाते माहिती ?
ई-पीक पाहणी द्वारे शेतातील कोणत्याही प्रकारचे पीक असो किंवा पडीक जमीन असेल किंवा बांधावरील झाडे असतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला नोंदवता येते. यात ई-पीक पाहणी करत असताना तुम्ही तुमच्या शेतातून जाणारी एखादी नदी असेल नोंद या ठिकाणी करू शकता. पडीक जमीन असेल किंवा एखादं झाड असेल त्याची नोंद करता येते. अनेक पिकांची नोंद या ठिकाणी करता येते, पिकाची नोंद थेट शेतातूनच केली जाते, अन्य प्रकारे केली जात नाही हे देखील लक्षात घ्यायचं त्यामुळे नक्कीच फायदेशीर आहे.
ई-पीक पाहणी हंगामामध्ये किती वेळा करता येते ?
शेतकरी बांधवांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ई पीक पाहणी किती वेळा कोणत्या हंगामामध्ये करावी लागते? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली देण्यात आले आहे. तर सर्वप्रथम ई पीक पाहणी ही प्रत्येक हंगामासाठी असते, या हंगामामध्ये तुम्ही पिकाची नोंद करू शकता. ई-पीक पाहणी मध्ये हंगामानुसार नोंद करू शकता. आता यानुसार तुम्हाला खरीप हंगामासाठी एक वेळा आणि रब्बी हंगामासाठी एक वेळा वार्षिक जर पिके असतील तर त्यासाठी देखील एकच वेळा ई-पीक पाहणी केले जाते.
ई पीक पाहणी संदर्भातील सर्वात महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी कारण असे अनेक प्रश्न होते जे की शेतकऱ्यांना माहिती नव्हते किंवा त्याचं उत्तर माहिती नव्हतं तर अशा सर्व प्रश्न जे उत्तरे आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेतले आहे. आता हा ई पीक पाहणी ब्लॉग बनवण्याचा महत्त्वाचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना ई पीक पाहणी संदर्भातील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये धन्यवाद.