ई पीक पाहणी ब्लॉग ई पीक पाहणी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहेत, हा ब्लॉग बनवण्याचा एकच उद्देश तो म्हणजे शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य माहिती देणे हा आहेत अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग वाचा.

E Peek Pahani New Method: ई पीक पाहणी करण्याची नवीन पद्धत 2025

E Peek Pahani New Method: तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलो आहे, मित्रांनो ई पीक पाहणी करणे हे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामासाठी तसेच वार्षिक पिकांसाठी गरजेचे आहे ई पीक पाहणी केल्यानंतरच तुम्हाला नुकसान भरपाई, पिक विमा, अतिवृष्टी भरपाई इतर सर्व भरपाई ही शासनाकडून तुम्हाला मिळत असते.

e pik pahani ही शासनाकडून ग्राह्य धरल्या जात असते त्यामुळे e pik पाहणी तुम्ही केली नसेल किंवा शेवटची तारीख निघून गेली असेल तरी देखील काळजी करण्यास कारण नाही कारण महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा आता ई पीक पाहणी करण्याचे 2 पद्धत आहे, तर अजून 1 नवीन पद्धत काय ? हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

राज्यात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील पिकाची नोंदणी अर्थात ई पीक पाहणीची मुदत बुधवारी (15) म्हणजेच या ठिकाणी संपलेली आहे आतापर्यंत 32 लाख 28 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाची पाहणी पूर्ण झालेली आहे आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती देखील समोर आलेली आहे.

E Peek Pahani New Method 2025

आता सहायकांच्या स्तरावरील पाहणी गुरुवारपासून सुरू होणार आहे, 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे यंदा राज्य सरकारने रब्बी हंगामातील 100% लागवड क्षेत्राची पिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता यातच आता ही माहिती तुम्हाला कळाली असेल जे काही सहाय्यक आहे यांना 28 फेब्रुवारी पर्यंत ई-पीक पाहणी करता येईल आता ई पीक पाहणीत चुकलेल्या नोंदीची दुरुस्ती 28 फेब्रुवारी पर्यंत करता येणार आहे रब्बी हंगामातील लागवड केलेले पिकांची नोंद करण्यासाठी राज्य सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे ॲप उपलब्ध करून दिलेला आहे.

📢 हे पण वाचा :- रब्बी ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 2025

ई पीक पाहणी शेतकऱ्यांच्या स्तरावर 1 डिसेंबर पासून बुधवार 15 करण्यात आली आहे राज्यात त्यानुसार या ठिकाणी 2 कोटी 9 लाख 48 हजार 735 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 30 लाख 43 हजार 366 रोजी लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे आता कायम पड असलेले 81,634 हेक्टर क्षेत्र, चालू पड असलेले एक लाख तीन हजार एकतीस हेक्टर क्षेत्र यातही नोंदवण्यात आलेल्या आहेत यानुसार आता 32 लाख 28 हजार 32 हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी अर्थात पूर्ण झालेली आहे.

ई पीक पाहणी करण्याची नवीन पद्धत ?

त्यामुळे नक्कीच या ठिकाणी फायदेच आहे, उर्वरित जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी देखील सहाय्यकांकडे ई पीक पाहणी सुरू आहे एकूण लागवड क्षेत्राच्या तुलनेत्व हे 15.41% इतके प्रमाण आहे शेतकऱ्यांची स्तरावरील पिक पाहणी संपल्यानंतर आता सहाय्यक उरलेल्या क्षेत्राचे पीक पाहणी करणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे.

पुढील 45 दिवस ही नोंदणी होणार असून ज्या शेतकऱ्यांची पिकाची नोंदणी केलेले नाही असे मी नोंदणी सहाय्यकमार्फत करावी असे ई पीक पाहणी प्रकल्पाच्या संचालक सरिता नरके यांनी या संदर्भात दिलेली आहे आता राज्यात असलेल्या सर्व 100% क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करण्याची निर्देश जामाव बंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत.

नोंदणी आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी चुकली असेल अशा शेतकऱ्यांनी दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येणार आहे यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत असून शेतकऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा ही केलेली ई पीक पाहणी आता महाभुमीच्या आपली चावडी यावर देखील उपलब्ध होणार आहे.

📢 हे पण वाचा :- पीक पेरा पीक विमा स्वयंघोषणापत्र मराठी Pdf 2025

त्यामुळे ही देखील नक्कीच फायदेशीर माहिती आहे, आणि नोंदणीची खात्री करण्यासाठी या पोर्टलचा वापर कमी करू शकता अशी माहिती सरिता नक्की संचालक ही पीक पाहणी भूमी अभिलेख यांनी या संदर्भात दिलेली आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या ई पीक पाहणी वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.

मी गणेश पाटील, पुणे महाराष्ट्र येथील रहिवासी असून माझ शिक्षण B.sc Agri झाल असून मी गेल्या 2 वर्षापासून नोकरी सोबत मला शेती बद्दल असलेलं ज्ञान मी या वेबसाईटच्या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत, हा माझा हा ब्लॉग फक्त ई-पीक पाहणी व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी बनवलेला आहेत धन्यवाद.

Leave a Comment