ई पीक पाहणी ब्लॉग ई पीक पाहणी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहेत, हा ब्लॉग बनवण्याचा एकच उद्देश तो म्हणजे शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य माहिती देणे हा आहेत अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग वाचा.

Tractor Anudan Yojana Form Kasa Bharaycha | Mahadbt ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा 2025

Tractor Anudan Yojana Form Kasa Bharaycha महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या हितासाठी नवनवीन योजना दरवर्षी शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो, शेतकऱ्यांसाठी ही चांगली ट्रॅक्टर अनुदान योजना आहे, या ट्रॅक्टर अनुदान योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदानावर पॉवर टिलर त्या संबंधित अवजारे/ ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर संबंधित यंत्र/ अवजारे या सर्वांसाठी शासनाकडून अनुदान मिळते.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एकाच अर्जामध्ये अनेक योजनांचा लाभ किंवा अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीम ही अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे या माध्यमातून शेतकरी प्रवर्गानुसार अनुदान मिळवून सदर बाबीचा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र शासनाच्या फार्मर स्कीम पोर्टलवर ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर संबंधी यंत्र/ अवजारे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यम करून दिले आहे, या ऑनलाईन माध्यमातून शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टल वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता.

ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर या ट्रॅक्टर आणि त्या संबंधित यंत्र अवजारांसाठी लॉटरी निवड पद्धत ही राबवली जाते ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला नाही आणि प्राधान्य असलेले शेतकरी किंवा महिला यांना लॉटरी द्वारे निवड केली जाते त्यानंतर ट्रॅक्टर व यंत्र/अवजारांचा लाभ दिला जातो.

Tractor Anudan Yojana Form Kasa Bharaycha आवश्यक कागदपत्रे लिस्ट 2025

मित्रांनो सदर महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील देण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • सातबारा उतारा
  • 8 उतारा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
  • निवड झाल्यानंतर ट्रॅक्टरचे कोटेशन बिल
  • शेतकरी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

मित्रांनो या ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ही आपण पहिले आहेत. आता महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय ? हे आपण खाली पाहणार आहोत.

हे पण वाचा :- ई पीक पाहणी फायदे व तोटे काय जाणून घ्या मराठीत 2025

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025 पात्रता काय ?

  1. शेतकऱ्यांकडे लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा उतारा
  2. महाराष्ट्राचा शेतकरी रहिवासी असावा
  3. लाभार्थ्यांकडे नावावर जमीन असणे आवश्यक
  4. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य
  5. अर्जदाराकडे स्वतःची बँक अकाउंटंट पासबुक असणे आवश्यक 
  6. लाभार्थ्यांनी तर कोणते योजनेतून सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

सदर योजनेत ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावे लागतील ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिलेली आहे.

  • सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टल यावर भेट द्या
  • नोंदणी केलेली नसेल तर नवीन नोंदणी करा
  • यानंतर लॉगिन या पर्यावर क्लिक करून यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • त्यानंतर तुमची प्रोफाइल पूर्ण 100% भरा 
  • महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा
  • कृषी यांत्रिकीकरण या पर्यायांमध्ये जाऊन सदर बाबीसाठी ऑनलाईन अर्ज करा

भरतीचा अर्ज ऑनलाईन माध्यमातून कसा करावा? हे तुम्हाला समजून येत नसेल तर खाली देण्यात आला ट्रॅक्टर अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा आवश्यक पात्रता कागदपत्रे काय आहेत याची माहिती खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.

ट्रॅक्टर ऑनलाईन अर्जयेथे पहा
ट्रॅक्टर ऑनलाईन अर्ज व्हिडीओयेथे पहा

मी गणेश पाटील, पुणे महाराष्ट्र येथील रहिवासी असून माझ शिक्षण B.sc Agri झाल असून मी गेल्या 2 वर्षापासून नोकरी सोबत मला शेती बद्दल असलेलं ज्ञान मी या वेबसाईटच्या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत, हा माझा हा ब्लॉग फक्त ई-पीक पाहणी व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी बनवलेला आहेत धन्यवाद.

Leave a Comment